आगामी लोकसभेला शिवसेना देशभरात 100 जागा लढवणार- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना देशभरात १०० जागा लढवू शकते, त्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत सध्या उत्तरप्रदेश मध्ये असून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही काय उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेसाठी २०० जागा लढवत नाही. आम्ही जास्तीत जास्त ५० -५५ जागा लढवत आहोत. खरे तर ही 2027 ची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा लढतोय. आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात 100 उमेदवार उभे करायचा शिवसेनेचा विचार आहे, तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, यावेळी त्यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले. मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलेला हा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हंटल तसेच ज्या ५ गोळ्या ओवेसींच्या गाडीवर फायर केल्या गेल्या. त्यातली सर्व गोळ्या टायरच्या वर लागतात, हे नेमके काय आहे? असा सवाल त्यांनी केला. ओवेसींकडे मुस्लीमही आकर्षित होत नाहीत. त्यासाठी हे सारे काही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.