हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तर्कवितर्क लढविले जात असताना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेवर पडदा टाकत ‘सामना’तून मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार असे सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत केल्या जात असलेल्या चर्चेबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. “महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार असून याबाबत कोणत्याही स्वरूपाच्या वाटाघाटी केल्या जाणार नाहीत.” असे राऊत यांनी सांगितले.
यावेळी राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टिका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, अशा निरागस, निष्कपट व्यक्तीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेछया देतो. आम्ही वाघाची मिशी पिळणार, असेल वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी यावेळी शिवसेना पक्षाच्या कामगिरीबाबत माहिती दिली. तसेच निवडणुकीबाबतही सांगितले. ते म्हणाले, ” आगामी काळात निवडणुकीत कोणत्या दिशेने जायचं हे सध्या सुरु आहे. आम्ही सध्या पक्षाची बांधणी करीत आहोत. उत्तर महाराष्ट्रात पक्षाच योगदान महत्वाचं आहे. आगामी निवडणुकीत जर सत्ता पुढे न्यायची सेल तर आघाडी सरकारची साथ महत्वाची असणे गरजेची असणार आहे.