व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

सातारा | ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 22/07/2021 रोजी पुराव्यासहित कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. तरीही आज 2022 उजाडले तरी त्या कागदपत्रांवर कोणताही कारवाई होत नाही. संबधित अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून शिवसेनेने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली.

सातारा वनविभाग कार्यालयात आज शिवसेनेच्या वतीने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तालुका प्रमुख अनिल गुजर, अतीस ननावरे, मोहन इंगळे, रमेश सावंत, उप तालुकाप्रमुख प्रशांत शेळके, विभाग प्रमुख हरिभाऊ पवार, सुनील साळुंखे, संजय इंगवले, सागर धोत्रे, शिवराम मोरे, रामदास कदम, अजय सावंत, अक्षय जमदाडे, सागर रायते, निखिल पिंपळे, राहुल जाधव, महेश शेडगे आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.  सचिन मोहिते म्हणाले, 2017 पासून 2021 पर्यंत या विभागात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. माैजे कोतवडे येथे रस्ते व ब्रीज बेकायदेशीपणे उभारण्यात आले आहेत. या कामातील वनविभागाचे गाैणखनिज गायब झाले आहे.

पुढे श्री. मोहिते म्हणाले, सर्व पुरव्या सहित सातारा वनविभागचे डी. सी. एफ. याना निवेदन दिले होते. तसेच या भ्रष्टाचार संदर्भात आवश्यक असणारी माहिती, माहिती अधिकार 2005 अंतर्गत सातारा तालुका आरएफओ याना मागितली होती. परंतु संबधित अधिकारी यामध्ये सहभागी असल्यामुळे सुरवातीला उडवा उडवाची उत्तरे देण्यात आली. परतू त्या संबधित अधिकारी यांची बदली झाल्यावर नवीन अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास सुरूवात केली. परंतु ती देखील अपूर्ण स्वरूपात मिळाली. यामुळे संपूर्ण प्रकरण सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले वरीष्ठ अधिकारी त्या संबधित भ्रष्ट अधिकारी याना वाचवण्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील 5 महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळेच शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज वन भवन येथे गांधीगिरी पद्धतीने अधिकारी याना गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात आले. येत्या पंधरा दिवसात जर संबधित अधिकारी यांची चौकशी होऊन कार्यवाही झाली नाही. तर भगतसिंह विचारांच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करून सातारा तालुका वनविभागाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.