Saturday, March 25, 2023

शिवसेनेचे आ. महेश शिंदेचा एल्गार : जरंडेश्वरचा पंचनामा झाला आता रयत शिक्षण संस्थेतून हुसकावून लावणार

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने एक विचार क्रांतीचा देणार आहे. रयत शिक्षण संस्था ही सातारा जिल्ह्याची आमची स्वताःची मालकीची आहे. परंतु काही चुकीच्या लोकांनी त्या संस्थेवर कब्जा केला आणि आमच्या जिल्ह्याच वाटोळं केलं. गेल्या 7 ते 8 वर्षात आमच्यातील एकही तरूण त्या रयत शिक्षण संस्थेत कधीही भरलेला नाही. त्यावेळी आमच्या लोकांनी पैसे दिले. आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांना आम्ही अर्थिक ताकद दिली. आम्ही जमिनी दिल्या. परंतु काही ठराविक लोक चुकीच्या पध्दतीने कुटुंबाच राजकारण शिक्षण संस्थेत आणतायत. भविष्याच्या काळात त्याच हे चुकीच राजकारण आपल्याला हुसकवून लावलं पाहिजे.  यांचा एल्गार आज मी यादिवशी करतोय, जे आमच्या जिल्ह्याची ताकद आहे. ज्या संस्था आमच्या जिल्ह्याच्या आहेत. त्या आमच्या जिल्ह्यातला लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, यांची सुरूवात चंचळीच्या व्यासपीठावरून करत आहे, असे म्हणत कोरेगाव तालुक्याचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी नविन वादाला तोंड फोडले आहे.

- Advertisement -

आ. महेश शिंदे कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले, यापुढे कोरेगाव मतदार संघातील कुठल्याही गोष्टीला कोणीही येवून हात लावू शकणार नाही. विधानसभेच्यावेळी सांगितले होते, जरंडेश्वरच्या बाबतीत सांगितले होते. त्याचा पंचनामा झाला आणि 27 हजार कोटीचा घोटाळा बाहेर आला. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. भविष्यामध्ये ही भूमिका घेवून राज्यात आणि जिल्ह्यात फिरणार आहे. रयत शिक्षण संस्थेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेतले जातात. शासनाचे 1540 कोटी रूपये अनुदान येत असतानाही पैसे घेतात ही शोकांतिका आहे.

मला कुठला मायकलाल हरवू शकत नाही

डी. पी. भोसले काॅलेजमध्ये पैसे घेतले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चांगल्या पध्दतीचे व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी ही संस्था काढली. पण आता त्याच बाजारीकरण चालले आहे. त्यासाठी महेश शिंदे तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहील. हाच विचार घेवून आपण पुढे निघायचो आहे. एकदिवस जरंडेश्वर कारखान्यांचा विचार घेवून निघालो आणि यशस्वी झालो. आज हा विचार घेवून व्यासपीठावरून जातोय, मला माझ्या राजकारणांची चिंता नाही. मला पाडायला कितीपण ताकद लावा. माझ्या सोबत भगवंत आणि सामान्य जनता आहे. कुठला मायकलाल मला हरवू शकत नाही, असा इशाराही आ. महेश शिंदे यांनी दिला.