हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान टीका करताना राणेंकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत नेहमी आदर राखला जातो. नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना त्यांच्याच पक्षातील माजी खासदार शिवाजी माने यांनी घरचा आहेर दिला आहे. शिवसेना राणेंसोबत योग्य वागत नाही. राणे यांच्या घामामधून शिवसेना पुढे आली आहे, हे विसरता कामा नये, असे माने यांनी म्हंटले.
शिवाजी माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आता बोलू नये, त्यांनी काय केले आणि किती खून पाडले यावर बोलू नये. तसेच राणेंनीही मातोश्रीविरोधात बोलण्याचे काही कारण नाही. ईडीचा घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्नं मांडा. ईडीच काय वाकड होणार हे ही आम्हाला माहीत आहे. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे काय झालं ते आत्ताचं होणारं आहे हे सर्वांनाच माहीत आहे . ही नविन समाजकारणाची पध्दती पहावयास मिळते आहे.
ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणु शकतो. बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत ( आपल्याशीचं )नं, काँग्रेस व राष्ट्रवादीं रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजितदादा वगळता या विषयावर कुणी भाष्य केल आहे हे एकविण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर – गरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत, अशाने काय साध्य होणार आहे? संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=4369089556526037&set=a.257400557694978&type=3
कुणी किती कष्टाने कमाई केलीं आहे ते संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता ते , किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते ? बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेतं त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्या वेळी ते कायं धुतल्यां तांदळा सारखे होते कायं ? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठीं त्यांनीच त्याच्या जिवाचीं पर्वा केली नव्हतीं हे विसरलात कां ?
एक व्हिडिओही व्हायरल
मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यांत मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं नं . ऊगाचं शिळ्यां कढीला ऊत काय आणतं आहात मग कॅा. दत्ता सामांतापासूनच्या हत्येचां शोध घेत बसां कोण कोण गुन्हेगार व गुन्हां करण्यास मदतं केली ते सर्व बाहेर येईलं शेवटी तुम्ही आम्ही सर्वचं जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोतं हे विसरून चाललोतं हे मात्र नक्की , फाटक्यांचे राज्यं कधी येणारं त्यांच स्वप्न कधी पुर्ण होणारं ? एक गोष्ट विसरू नकां मुबंईला वाचविणारी मंडळीचं आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीचं वाट काँग्रेस पहात आह, असेही माने यांनी लिहले आहे. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी नारायण राणे यांचे समर्थन केले आहे.