सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार; शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा

Shivendraraje Bhosale Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
“काँग्रेस पक्षाने आता तरी सुधारावे, पक्षाची वाताहत झाली आहे. लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील काँग्रेस केव्हाच संपली आहे त्यांना सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार आहे,” असा इशारा भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वखालील आज भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजेंनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले कि, महापुरूषाची बदनामी करण्यामुळे योग्यवेळी मताच्या स्वरूपात दणका बसेल. देशप्रेम, धर्माबद्दल ज्यांना प्रेम, निष्ठा आहे, ते ही बदनामी सहन करणार नाहीत. सातारा जिल्हा, जावळी व सातारा मतदार संघातील जनतेच्या वतीने राहूल गांधी व काँग्रेसचा निषेध व्यक्त करत आहे.

दरम्यान, सातारा येथील तालीम संघ मैदान येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होते. या यात्रेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.