मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते भाजपमध्ये जणार यावर त्यांच्या राजीनाम्याने शिक्का मोर्तब केले आहे.
उदयनराजे भोसले यांच्या सोबत त्यांचे वाद असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले खिंडार पडले आहे. तर शिवेंद्रराजे भोसले यांना शरद पवार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. आपले कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल असे शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांना सांगितले होते.
आपण कोणाच्या हि दबावात हा निर्णय घेतला नाही. तसेच कोणावर देखील नाराज होऊन हा निर्णय घेतला नाही. आपण स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या मताने हा निर्णय घेतला आहे कारण हीच वेळ आहे काही तरी करून दाखवण्याची म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे शिवेंद्र राजे म्हणाले. या दरम्यान उदयनराजेंच्या वादावर देखील त्यांनी भाष्य करायला टाळले नाही. उदयनराजेंच्या उमेदवारीला आपला विरोध होता तरी देखील शरद पवारांच्या शब्दाखातर आपण त्यांचा प्रचार केला असे शिवेंद्रराजे म्हणाले.