वाशिम : हॅलो महाराष्ट्र – देशात ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग (Shivling) सापडल्यावरून हिंदू मुस्लिम वाद पेटला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात एका विहिरीत गाळ उपसताना पुरातन शिवलिंग (Shivling) आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. विहिरीत शिवलिंग सापडल्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरताच शिवभक्तांनी एकच गर्दी केली आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे कांरजा शहरातील टिळक चौकातील विहिरीचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे गाळ काढण्याचे काम सुरु असताना एक भला मोठा दगड आढळून आला. त्याची नीट पाहणी केली असता सुमारे 300 ते 400 वर्ष जुने शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात विहिरीची पाणी पातळी खालावल्याने विहिरीतील गाळ काढून स्वच्छ करण्याच्या उद्देशाने टिळक मित्र मंडळाच्यावतीने विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विहिरीतील गाळ काढणे सुरू असताना त्यात एक पुरातन शिवलिंग आढळले आहे. हे शिवलिंग जवळपास साडे 300 ते 400 वर्ष जुने असल्याची माहिती कांरजा येथील अजय महाराज यांनी दिली आहे. हे शिवलिंग नर्मदा नदीत आढळत असल्याने याला नर्मदेश्वर शिवलिंग नांव देण्यात आले आहे.
ही विहीर जवळपास 30 फुट खोल असून गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरीची साफसफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे शिवलिंग एखाद्या व्यक्तीने विहिरीत टाकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे पुरातन शिवलिंग (Shivling) पाण्याने स्वच्छ करून जवळच्याच एका झाडाखाली ठेवण्यात आले आहे. लवकरच त्याची विधिवत स्थापना करण्यात येणार असल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात आले आहे. या शिवलिंगाची (Shivling) बातमी शहरात पसरताच शिवभक्तांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान