राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये काही आलबेल दिसत नाही. याचच एक उदाहरण नागपूर येथे दिसलं. नागपूरमधील शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
आशिष जैस्वाल म्हणाले, कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते,यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती. शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’ असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या वादांवर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल