सांगली प्रतिनिधी । काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाटाघाटी सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या आक्रमक मागणीवरून शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थापन हालचालींना वेग आला. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम आहे. सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याभेटी दरम्यान साहेब काही करा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच मुख्यमंत्री करा अशी भावना एका शेतकऱ्याने उद्धव यांना बोलून दाखवली.
उद्धव ठाकरे हे सांगली जिल्हाच्या खानापूर विटा येथील नुकसानग्रस्थ पिकांची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शेतमालाची पाहणी करण्यास जाण्यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एका शेतकऱ्याकडून “साहेब मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा अशी आर्त मागणी केली.