आता भाजपच्या सर्व ताई, माई अक्का तोंडाला कुलूप लावून बसले; राऊतांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच बोरिवली येथील भाजप कार्यालयात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे. बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले आहेत अशी टीका शिवसेनेने केली.

, मुंबईतील साकीनाक्यातील घटनेच्या जखमांचे व्रण ताजे असतानाच डोंबिवलीच्या घटनेने महाराष्ट्राचे समाजमन हादरले. विकृतीचा कळस गाठणाऱ्या घटना देशभरात वाढत आहेत. त्यात महाराष्ट्रानेही सामील व्हावे याची खंत वाटते. 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत घडली. हे अत्याचार गेले आठ महिने सुरू होते. ही अशी प्रकरणे समोर येतात व राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करुन आपापल्या राजकीय मतलबाच्या पोळ्या भाजतात तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते. असे शिवसेनेने म्हंटल.

डोंबिवली प्रकरणाचा गवगवा सुरू असतानाच बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले आहेत अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे. बोरिवली प्रकरणातही भाजपच्या ताई-माई-अक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला ते साकीनाका, डोंबिवलीप्रकरणी. हे धोरण दुटप्पी आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

Leave a Comment