RSS ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना, ते तालिबानी कसे? सामनातून जावेद अख्तर यांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही अफगाणिस्तान मधील तालिबान्यांशी केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून जावेद अख्तर यांना खडबोल सुनावलं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.

तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी मांडले आहे व त्याबद्दल काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे असे शिवसेनेने म्हंटल आहे.

संघाची भूमिका व जावेद अख्तर यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल?,’ असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. संघाची स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका संशयास्पद असल्याचा आक्षेप काही विरोधक घेत असतात. तो मुद्दा बाजूला ठेवा; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही. असे शिवसेनेने म्हंटल.

धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे आंदोलन करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे?,’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

You might also like