व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

12 जणांची आमदारकी रद्द करा; शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडा नंतर शिवसेनेचे आक्रमक होत मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष रहरी झिरवळ यांच्याकडे सादर केली आहे.

सदर आमदारांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहण्याची नोटीस देऊनही ते बैठकीला गैरहजर राहीले त्यामुळे आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना त्यांचे सदस्यत्व कायदेशिररित्या रद्द व्हावे यासाठी पीटीशन दिली आहे. अशी माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांना दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या आमदारांचा समावेश

1) एकनाथ शिंदे
2) यामिनी जाधव
3)महेश शिंदे
4) लता सोनावणे
5)प्रकाश शिंदे
6) संजय शिरसाठ
7) अब्दुल सत्तार
8)भरत गोगावले
9) संदिपान भुमरे
10) अनिल बाबर
11) प्रकाश सुर्वे
12) तानाजी सावंत