वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कारकडून तीन अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसई : हॅलो महाराष्ट्र – वसईमध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कारकडून तीन अपघात (Accident) झाले आहेत. इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत गोखीवरे ते मधूबनपर्यंत गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास तीन अपघात (Accident) केले आहेत. या भीषण अपघातात (Accident) एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ज्या इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत अपघात (Accident) केला आहे, त्या कारमध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची ही कार असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले आहे. या भीषण अपघातानंतर मद्यधुंद कारचा चालक आणि गाडीतील अन्य 2 जण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीचा ताबा घेऊन ती गाडी मुख्य रस्त्यावरून बाजूला केली. पण महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लिहिलेल्या कार दारू पिऊन चालवणारा चालक आणि त्यामधील अन्य दोन फरार झाले आहेत. त्यामुळे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लिहिलेला असल्याने पोलीस आता यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे आहे.

हे पण वाचा :
आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले

Leave a Comment