नवी दिल्ली । चिनी अॅपवरील बंदीवरून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली आहे. चिनी अॅप्सपासून धोका आहे हे माहीत होतं तर या कंपन्या सुरू का होत्या? कि, चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानांची वाट पाहात होता का? २० जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरू राहिल्या असत्या, अशा तिखट शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
भारत-चीन सीमावादावर राजकारण होता कामा नये, हा राजकीय धोरणाचा भाग आहे, असं सांगतानाच चीनचं आर्थिक कंबरडं मोडायलाच पाहिजे. संपूर्ण देशाचीही तिच भावना आहे. चीनमध्ये आपण मोठी गुंतवणूक करतो. त्यांची आपल्याकडे गुंतवणूक होते. त्याबाबतचं धोरण ठरवलं पाहिजे. नाही तर पाकिस्तान सोबत असं धोरण ठेवतो, तसं होता कामा नये, असा चिमटाही त्यांनी काढला.
चिनी अॅप्सवर बंदी घातली त्याला आमचा विरोध नाही. या बंदीचं आम्ही स्वागत करतो. पण या अॅप्सपासून धोका आहे, हे माहीत असतानाही त्यावर बंदी का घातली गेली नाही? असा सवाल करतानाच तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही, गुलाबजाम होता असं होवू नये, असा टोला राऊत यांनी टोला लगावला. तसेच केंद्र सरकारने चीन सोबत लढावं विरोधकांशी लढू नये. ही लढाई चीनसोबत व्हावी, काँग्रेस-भाजप अशी लढावी होऊ नये, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”