मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा भर सभेत गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुहागर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून आतापासून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भरसभेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा, असा थेट आरोप भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याकडून करण्यात आला आहे.

नेमके काय म्हणाले भास्कर जाधव?
शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी थेट भाजपला लक्ष्य केलं आहे. 40 आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता भाजप दोन समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल. वाट्टेल ते झालं तरी मुस्लिम तरुणांनी डोकं शांत ठेऊन भाजपचा डाव ओळखून मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसनेनेला सत्तेत आणू, असे आवाहन भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे.

तसेच यावेळी त्यांनी हिम्मत असेल तर राजीनामा देऊन लोकांच्या मताला सामोरे जा, असं खुलं आव्हान बंडखोर आमदारांना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिले आहे. यादरम्यान त्यांनी माजी आमदार रामदास कदम यांच्यासह नारायण राणे यांच्यावरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देतंय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?