हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असं समोर आलं आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार अर्णब गोस्वामी यांचं कोर्ट मार्शल करणार का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, अर्णव गोस्वामी यांच्या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बोलायला पाहिजे. इतर वेळी भाजप नेते देशातील सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. आता या प्रकरणावर त्यांनी बोललं पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहिती होतं हे दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे”. संजय राऊत यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी यावर भाष्य करण्याची मागणीदेखील केली आहे. त्यांनी आपली मतं सांगून आमच्या ज्ञानात भर टाकावी असा टोला त्यांनी लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’