भाजपच्या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं ; संजय राऊतांची विरोधी पक्षांना हाक

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडताना देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली आहे. देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.बअनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढून सत्तेत आले आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत. हे पक्ष यूपीएचा भाग नाहीत. त्या सर्वांनी यूपीएत आलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा अशी नाही, असंही राऊत म्हणाले

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्राचं अजिबात पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहेच, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी हीच परिस्थीत आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले. आता काही निवडणुका नाहीत. पण मोदींच्या विरोधात विरोधकांनी एकत्र आलंच पाहिजे. अस संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’