हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे तसेच भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या वेदना समजून घ्यायला हवी असा सल्लाही त्यांनी दिलाय. आंदोलन करण हा भाजपचा अधिकार आहे. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. पण त्यांनी नाईक कुटुंबाला भेटून त्यांच्या भावना समजून घ्याव्या असे ते म्हणाले.
अर्णब गोस्वामी हे भाजपाचे कार्यकर्ते आहे. त्यांचे चॅनल हे पक्षाचा लाऊडस्पीकर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी सर्व भाजप नेते उतरले. गोस्वामींवर केलेली कारवाई पत्रकार म्हणून नाही. रिया चक्रवर्तीच्याबाबतीत भाजपची वेगळी भूमिका असते. आणि अन्वया नाईक यांच्याबाबतीत वेगळी असते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नोट नव्हती तरी प्रकरण पुढपर्यंत नेलं. याप्रकरणात सुसाईड नोट असून त्यात नावे देखील. आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे बाहुल्या नाहीत असे राऊत यांनी म्हटले.
अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन जर भाजपवाल्यांनी त्यांना काय वाटतं ते समजून घ्यायला हवं असे राऊत म्हणाले. ंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. या देशात मानवता, सत्य, न्याय या शब्दाचा वापर कधी करु नये. अर्णव यांच्यावरील हल्ला पत्रकार स्वत:वरचा हल्ला मानायला तयार नाहीत. कोणावरच अन्याय होणार नाही. आणि सत्याचा परायजय होणार नाही असे राऊत यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’