शिवसेनेचं धनुष्यबाण आम्हालाच मिळणार; बंडखोर आमदाराचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण आम्हांलाच मिळणार असून येत्या 2-3 महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात. पण त्यांच्या भोवताली असलेले काँग्रेस- राष्ट्रवादी त्यांना सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता असेही ते म्हणाले.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज प्रथमच बंडखोर आमदार संजय गायकवाड आपल्या बुलढाणा मतदारसंघात गेले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. 2019 ला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्हाला पण आनंद झाला होता. परंतु त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला निधी मिळू दिला नाही, आमच्याच तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यामुळे व्यथित होऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले आहेत असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. संजय राऊतांनी आमचा बाप काढला पण त्याच राऊत यांना आम्ही 42 मते दिली आहेत. त्यामुळे हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का असा बोचरा सवाल त्यांनी केला.

Leave a Comment