हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, शिवसेना आमदाराचे भाजपला ओपन चँलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवा असे आव्हान शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपचे नाव न घेता पाटील यांनी भाजपला आॅपन चँलेंज दिले आहे.

हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा असं चँलेंज देत आमदार फोडणे म्हणजे मंडईतला भाजीपाला आहे काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला अाहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून आज उद्धाव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहिर करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेला आमदार फुटण्याची भिती वाटते काय? असा सवाल एका पत्रकाराने विचारला असता पाटील भडकले.