हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी करत भाजपवर हल्लाबोल केला.
आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरु आहे त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले
भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.