देशात असे खूप चुतीया लोक आहेत; संजय राऊतांची सोमय्यांवर टीका

raut somaiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कडून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना त त्यांचा उल्लेख चुतीया असा केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, देशात असे खूप चु# लोक आहेत. पण अशा चु# लोकांच्या बोलण्यावरून देशाच्या राजकारणासंदर्भात प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. देशात २०२४ नंतर अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, ते संपतील. २०२४ नंतर देशात लोकशाही येईल, राजकारण पारदर्शक असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

के. चंद्रशेखर राव हे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. भाजपचे नेते याची खिल्ली उडवतात. त्यामुळे मी संबंधित नेत्यांना चु# बोललो. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते, ही योग्य बाब नाही. हा मुख्यमंत्र्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.