एक पुतीन दिल्लीत बसून आमच्यावर मिसाईल्सचा मारा करत आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सातत्याने पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक पुतीन दिल्लीत बसून आमच्यावर मिसाईल्सचा मारा करत आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊत सध्या नागपूर येथे असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, रशिया-युक्रेनप्रमाणे आपल्या देशात प्रत्यक्ष युद्ध सुरू नसले तरी आमच्या सारख्यांना दररोज युद्धाचा अनुभव येत आहे. दिल्लीतील ‘पुतिन’आमच्यावर रोज ईडी, सीबीआय इत्यादी केंद्रीय यंत्रणारूपी ‘मिसाईल्स’चा मारा करत आहेत. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून तरीदेखील वाचलो आहेत.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनची खिल्ली उडवली. पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईल. त्यांच्या बाजूला बसेल. पुढच्या वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल, असं संजय राऊत म्हणाले