हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले असून जर सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 7 जून पासून आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया देत मोदींकडे बोट दाखवले. मराठा आरक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून मोदींकडे जाऊया कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असं राऊत म्हणाले.
खासदार संभाजी राजे हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते एक महत्वाचे नेते सुद्धा आहेत. मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांना खरी भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राच्या हातात आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट झालंय”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.