हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्रउडाली आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकत अशी चर्चा देखील जोर धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. काही लोकांना अशी स्वप्न पडत असतात पण अस काही होणार नाही असे राऊतांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, काही लोकांना अशी स्वप्न पडत असतात. अशी स्वप्नं पडणं हा एक आजार आहे. ज्यांना अशी स्वप्न पडतात त्यांनी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील हे महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल. 5 वर्ष सरकार चालवण्याची जी कमिटमेंट आहे ती या सरकार मधील कोणीही मोडणार नाही आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.