हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीए चेअरमन करावे अशी पुन्हा एकदा मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी UPAचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलंय. इतकच नाही तर UPAचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणालेत
महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की युपीएचं पुनर्गठन केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. यानंतर राऊतांना विचारण्यात आलं की तुम्ही युपीआयचे घटक नाही आहात?, यावर राऊत म्हणाले, आम्ही एनडीएतून बाहेर पडलो आहोत आणि अकाली दलही बाहेर पडलं आहे तर ममता बॅनर्जी आणि युपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत की जे युपीए किंवा एनडीएमध्येही नाहीत. मात्र ते युपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचं असेल तर UPA मजबूत करायला हवं आणि UPAला मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल’. तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येतं. काँग्रेस नेत्यांनी ते स्वीकारायला हवं. शरद पवार यांना UPAचा अध्यक्ष बनवल्यावर UPA अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group