‘सत्तेचे स्टेअरिंग जरी अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो’- संजय राऊत

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंतत्री उद्धव ठारेंसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. तर, या वाहनाची स्टेअरिंग अर्थात ते चालवण्याची जबाबदारी ही खुद्द अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, ”फोटोमध्ये स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो.” संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून यावर काही प्रतिक्रिया दिली जाणार का यांवरही आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

मराठाविना राष्ट्र गाडा न चाले हे विनोबा भावेंचं वाक्य आजही का चालतं? आज देशाच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण होताना दिसते. शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, त्याच्यात त्या क्षमता आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्राचा चेहरा असतो, राष्ट्रचं राज्यावर लक्ष असते. आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालायला हवे, असे राऊत यांनी म्हटले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावं म्हणजे महाराष्ट्रात लक्ष न द्यावं असं नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपद सांभाळूनही राष्ट्रीय राजकारण करता येते. उद्धव ठाकरेंमध्ये ती धमक आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here