हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांचा समाचार घेतला. चंद्रकांतदादांनी अफवा पसरवण्याचा आनंद घ्यावा असा टोला संजय राऊतांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी हवेत गोळीबार मारू नये, कोणी कोणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर भाजप नेते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर तो त्यांनी घ्यावा. पण मी अजून सांगतो की हे सरकार अजून 3 वर्ष उत्तम प्रकारे चालेल असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे, त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.