काँग्रेसमुळेच हे सरकार अस म्हणणाऱ्या नाना पटोलेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले की…

0
26
raut and nana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही वेगवेगळे पक्ष असल्यानं अंतर्गत कुरघोडी सुरूच असतात. याच दरम्यान हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत.” असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान नाना पाटोलेंच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसशिवाय सरकार आहे असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. कोणीही ते नाकारलेलं नाही. काँग्रेस हा सरकारचा एक स्तंभ आहे. नाना पटोलेंना ही शंका का यावी?,’ असा उलट सवाल राऊत यांनी केला आहे.

हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही,” असं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here