भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली; राऊतांची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून खेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली.

संजय राऊत म्हणाले, भाजपला कोरोना झाला म्हणून ते सत्तेबाहेर आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना मास्क घालण्याचं आवाहन केलं. तुम्ही मास्क नाही घातलं तर उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. आधी माझी चंपी करतील. नंतर तुमचं नाव घेऊन फटकारतील. असे राऊतांनी म्हंटल.

भाजपानं युतीतही गद्दारी केली-

दरम्यान, भाजपानं युतीतही गद्दारी केली, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपनं युतीतही गद्दारी केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात. आम्ही तुमचं सरकार पाडलं, असा हल्लाही त्यांनी चढवला

Leave a Comment