शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

0
37
chandrakant patil sanjay raut 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. याच दरम्यान शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा अशा शब्दांत राऊतांनी पाटलांवर पलटवार केला.

संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात ठेवली. चंद्रकांत पाटलांसारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात, शिवसेना नसती तर तेही शक्य झाले नसते. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला असेही राऊत यांनी म्हंटल.

चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते.  ब्रिटिशांच्या कामांची आठवण करून देता ना, मग सध्या संसद भवनही ब्रिटिशांच्याच काळात झालेले आहे, असे सांगून राऊत म्हणाले, की मुंबईसाठी शिवसेनेच्या योगदानाची लंबी यादी देता येईल. रस्ते, पाण्यापासून स्थानिकांना रोजगारापर्यंतची अनेक कामे शिवसेनेने केलेली आहेत. असेही राऊतांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here