देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं; सोनू सूदच्या भेटीसाठी आतुर चाहत्याची पायी वारी

Sonu Sood
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद याने लॉकडाउनच्या काळात अनेकांची मदत केली आहे. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीची आस घेऊन आणि काहीजण आभार व्यक्त करण्यासाठी जमा झाल्याचे दिसतात. मात्र सोनू सूदचा एक असा चाहता आहे जो सोनूला भेटण्यासाठी हैदराबादवरून चक्क पायी निघालाय. दररोज ४० किलोमीटर चालत सोनूचा हा जबरा फॅन थोडे थोडे अंतर कापत आहे. खरच काय कमाल आहे ना… ? कुणाला विठूरायाची ओढ खेचत पंढरपुरास नेते तर कुणाला संकट काळी धावून आलेल्या देवदूताच्या भेटीचा ध्यास लागतो.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1403219433376555016

 

हा युवक मूळचा तेलंगणा मधील दोरनापल्ली या गावातील एक रहिवासी आहे. याचे नाव व्यंकटेश हरिजन असे आहे. हा युवक केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी चालत मुंबईला निघाला आहे. १ जून २०२१ पासून तो दररोज सरासरी ४० किलोमीटर चालत अंतर पार करत आहे. आज तब्बल ३०० किलोमीटर चालत तो सोलापुरात येऊन पोहोचला आहे. अभिनेता सोनू सूद हा खरोखरीच अनेकांसाठी देवासमान आहे. संकट काळात जो मदतीसाठी धावून येतो त्याला आणखी काय उपमा दिली जाणार.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1403217952661331973

 

या संदर्भात माध्यमांशी बोलताना या युवकाने सांगितले कि, सोनू सूद आमच्या साठी देवासमान आहे. तो प्रत्येकाची मदत करतोय. मुख्य म्हणजे देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं. त्यामुळे मी सुद्धा पायीच निघालोय. अशी भावना व्यंकटेशने व्यक्त केली. दरम्यान अभिनेता सोनू सूद याने स्वतः फोन करून त्याला वाहनाने मुंबईला येण्यास सांगितले. मात्र व्यंकटेश काही ऐकायला तयार झाला नाही. शेवटी सोनू सूद फाउंडेशनचे कार्यकर्ते विपुल मिरजकर यांनी सोनू सूदशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून व्यंकटेश याच्याशी बोलणं करून दिलं. त्यावेळी व्यंकटेश गाडी द्वारे मुंबईला जाण्यासाठी तयार झाला. या दरम्यान आपल्या सर्वांचे प्रेम माझ्यावर आहे. अशा पद्धतीने चालत येणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे असा प्रयत्न कोणीही करू नये अशी विनंती अभिनेता सोनू सूद याने केली.