आम्ही ईडीला 50 नावे दिली, त्याची चौकशी का नाही केली ?? संजय राऊतांचा सवाल

0
34
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. ईडी असो वा इन्कम टॅक्स, शिवसेना त्रास देण्यासाठी हा सगळं प्रयत्न सुरु असून आम्हीही ईडीला ५० नावे दिली त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला.

आता इन्कम टॅक्स नावाची भानामती आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत या धाडी सुरूच असतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन आहेत. तेच भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे एजंट आहेत असा आरोप त्यांनी केला.

ईडीचे अधिकारी मोठमोठ्या बिल्डर्सना धमकवतात. ज्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली त्या कंपन्यांनी ईडीचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र नवलानी यांना पैसे पाठवले. आपण ईडीच्या ४ अधिकाऱ्यांची तक्रार पोलिसांना केली असून अनेक अधिकारी जेल मध्ये असा इशारा संजय राऊत यांनी केला

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here