आता जेलमध्ये हनुमान चालीसा वाचा, तुमच्या बापाचे राज्य आहे का? राऊतांचा घणाघात

raut rana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हनुमान चालीसाला महाराष्ट्रात कुठेही विरोध नाही. पण तुम्हाला जर हनुमान चालीसा वाचायचीच असेल तर जेलमध्ये वाचा किंवा फडणवीसांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचा असा टोला संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते, राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यावरील राजद्रोहाचा गुन्हा योग्यच आहे संजय राऊत यांनी म्हंट्लं

हनुमान चालीसाला महाराष्ट्रात कुठेही विरोध नाही, आता राणा दाम्पत्याला जेलमध्ये पाठवलं आहे तिथे त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, नाहीतर देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचावी, या महाराष्ट्रामधे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला कोणीही विरोध केलेला नाही पण तुमचा जो हट्ट आहे कि मातोश्री मध्ये घुसून हनुमान चालीसा वाचू तर मग आम्ही म्हण घुसू असं म्हणत तुमच्या बापाचे राज्य आहे की अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली