हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.
शरद पवार आणि पवार-मोदींची भेट राजकीय आहे असं मला वाटत नाही. या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल असे संजय राऊत यांनी म्हंटल. शरद पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, शरद पवार हे देशाचे प्रमुख नेते असून सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? असा सवाल करत प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही,’ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.