अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटले की- ‘लिहायला काहीच नाही’, तेव्हा ट्रोल करत युझर्स म्हणाले- ‘मग पेट्रोलवर काहीतरी लिहा’

बॉलिवूड । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत आणि ते बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात, ज्यामुळे ते सवुच चर्चेत राहतात. बिग बी यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास एक ट्विट केले, ज्यानंतर अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केले.

अमिताभ बच्चन यांनी नेहमीप्रमाणे आजच्या सकाळी एक ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- ‘आज लिहायला काहीच नाही’. अमिताभ यांची हि पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी त्यांना ट्रोल केले आणि टीका करण्यास सुरूवात केली.

ट्रोल करताना लोकं सांगत आहेत की,” जर काहीही नसेल तर महागाई आणि पेट्रोलच्या किंमतीवर काहीतरी लिहा.” काही युजर्सनी 2012 चे एक ट्विटदेखील काढून दाखवले, जे त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीबद्दल लिहिले होते. पाच मुद्दे देत एका युझरने लिहिले- “अमिताभ बच्चन लिहायला खूप काही आहे.”
1- देशातील वेगवेगळ्या राज्यात आलेल्या पुराबाबतलिहा.
2- देशातील वाढत्या महागाईबाबत लिहा.
3- देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत लिहा.
4- देशातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीबाबत लिहा.
5- या देशातील हुकूमशाही वृत्तीवर सर्वोच्च पातळीवर आहे त्याबाबत लिहा.

अमिताभ बच्चन अनेकदा मध्यरात्रीनंतर सोशल मीडियावर ट्विट किंवा पोस्ट्स शेअर करतात, ज्याबद्दल लोकं नेहमीच प्रश्न विचारतात. कामाबद्दल बोलायचे तर ते लवकरच ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘मेडे’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like