होळी वर्षातून एकदा येते पण भाजपवाले रोजच शिमगा करतात; राऊतांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या रंगात भेसळ आहे. होळी ही वर्षातून एकदा येते पण भाजपवाले रोजच शिमगा करतात असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला तसेच आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग आहेत. भाजपाचा रंग बनावट असून त्यांचे रंग भेसळयुक्त आहेत. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही असे राऊतांनी म्हंटल

दरम्यान, राज्यात परत भाजपचे सरकार येणार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे,” असं संजय राऊत म्हणाले.