हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरून आता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आणि घटना दुरुस्ती वरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस हे वकील असून त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, आरक्षणाबाबत कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो. काही वकिली सल्ला लागला तर सरकार नक्कीच त्यांचा सल्ला घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असं राऊत म्हणाले.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या वर वाढवता येणार नाही अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्याच्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही त्याच्यावर आरक्षण राज्य देऊ शकेल कि नाही, यात शंका आहे. पण आम्हाला खात्री आहे कि, जो महाराष्ट्रातील मराठा समाजाचा जो रेटा आहे. त्याचमुळे सरकारला यातून मार्ग काढावा लागे. परंतु आम्हाला केंद्राने जो डब्बा दिला आहे. तो सध्या रिकामा आहे, असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारला टोला लगावला.