महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काहीही झालं तरी महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना एक धडा ४०० वर्षांपूर्वी जो शिकवला, तो असा आहे. की महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही. स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी महाराष्ट्र लढत राहील आणि शत्रू जर अंगावर आला. तर त्याची बोटं छाटली जातील.

प्रतापगडावर तर अफजल खानाचा कोथळाच निघाला आणि २५ वर्षे लढून देखील औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्कारावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहीत आहे. हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी समजून घेतला पाहिजे. ” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment