पटोले तुम्हाला काय बोलायचे आहे ते भान ठेऊन बोलावे ; शिवसेनेचे खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पटोले यांच्या या वक्तयावाचा शिवसेनेच्या समाचार घेतला असून त्यांना खडेबोल  सुनावले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्त्यवावर शिवसेनेचे खासदार अरविद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली तसेच पाटोळेंना खडेबोल सुनानावताना त्यांनी म्हंटले आहे कि, पटोले यांना महाविकास आघाडी सरकारबद्दल काही अडचण वाटत असेल तर त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावावं. त्यांच्याकडे जायचे नसेल तर बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करावी.

मात्र, अशी टीकेची वक्तव्ये करू नये. अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. त्यांच्या सारख्या लोकांमुळे मुख्यमंत्र्याची प्रतिमा काही केल्या खराब होणार नाही. हि गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. पटोले सध्या जे काही बोल्ट आहे. यावर व त्यांना कसे थांबवायचे यावर मुख्यमंत्री तसेच त्यांचा पक्ष निर्णय घेईल, असे सावन्त यावेळी म्हणाले.

Leave a Comment