सांगोला : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नुकताच सांगोल्यामध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधत भरसभेत त्यांचा उल्लेख सोंगाड्या, असा केला. यावेळी विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) यांचा चांगलाच समाचार घेतला. शहाजीबापू पाटील यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस फक्त विनोद करू शकतो, एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करू शकत नाही. सांगोल्यातल्या जनतेच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे. सांगोल्याची लहान मुलंही शहाजीबापू (Shahjibapu Patil) नॉट ओके, शिवसेना ओके, म्हणतात, असे वक्तव्य विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी यावेळी केले.
विनायक राऊतांचा 'सोंगाड्या' जिव्हारी लागला, शहाजीबापूंनीसुद्धा दिले चॅलेंज pic.twitter.com/H2gx65C5M5
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 22, 2022
शहाजीबापू पाटील यांच्याकडून समाचार
विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या या टीकेला शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil)यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘विनायक राऊत यांनी सांगोल्यात उरल्या सुरल्या तुटपुंज्या शिवसेनेची सभा घेतली. सांगोला तालुक्यात शिवसेना लाखोंनी मेळावे भरवत होती, पण विनायक राऊत यांच्यावर 50-60 टुकार पोरं घेऊन मेळावे भरवण्याची वेळ आली आहे. सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आणि शहाजीबापू सोंगाड्या, असं ते म्हणाले. विनायक राऊतांच्या (Vinayak Raut) प्रत्येक मुद्द्याला कोकणात त्यांच्या मतदारसंघात जाऊन पावसाळा संपल्यानंतर 7 तालुक्यांमध्ये 7 सभा घेऊन सडेतोड उत्तर देणार, विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ आत्ताच काढून ठेवावा,’ असं प्रत्युत्तर शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil)यांनी दिले आहे.
विनायक राऊत काय म्हणाले ?
शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भरसभेत ‘सध्या महाराष्ट्रामध्ये काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आहे, तर एक बिनदाढीवाला आहे. बिनदाढीवाल्याच्या मनात आलं की खेचलं मागे, मग दाढीवाला पडला. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा,’ असे वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील निशाणा साधला.
हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली