सावरकर, राहुल गांधी अन् भाजप; सामनातून थेट भाष्य

shivsena savarkar rahul gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून थेट वीर सावरकर यांच्यावर गंभीर टीका केली. यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं. एकीकडे भाजप आणि मनसे हे विरोधक आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेनेनेही राहुल गांधी यांची भूमिका अमान्य केली आहे. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून थेट भाष्य करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांना सल्ला देतानाच सामनातून भाजपवर तोफ डागण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी श्री. राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी ज्यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिथे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती असं शिवसेनेने म्हंटल.

राहुल गांधी यांनी हिंगोलीत विधान केले की, “सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजासोबत काम करायचे, “त्याशिवाय, ‘मला मुक्त करा, मी बाहेर येताच आपल्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काम करीन,’ असेही सावरकर यांच्या याचिकेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले व त्याबाबतची कागदपत्रे पत्रकारासमोर फडकवली. या सगळ्याची गरज नव्हती. पण हे श्री. राहुल गांधी यांना सांगायचे कोणी? सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांच शिरोमणी होते. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले.

ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावले. या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी 10 वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दवा याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तुरुगात सहत मरण्यापेक्षा बाहेर पडून थांबलेले क्रांतिकार्य पुढे न्यावे, असे त्यांना वाटत असावे. पुन्हा इकडे बाहेरही स्वतः सिंहात्मा गांधी यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. सावरकरांनी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारको दया याचिका करायला हरकत नाही हे महात्मा गांधीचेही मत होते. निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला असतो. त्यानुसार सावरकरांनी सरकारकडे याचिका केली. सावरकरांच्या सहा दया याचिका सरकारने फेटाळून लावल्या हेसुद्धा खरे .. त्यानंतर अटी व शर्तीवर पुढे सावरकरांची सुटका झाली तरी त्याच्यावर ब्रिटिशांची करडी नजर होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा स्वातंत्र्य लढयात काडीइतकाही संबंध नव्हता, तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखड केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. गेल्या आठ वर्षापासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. वीर सावरकरांचा समान एकही काम फडणवीस मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरच्या माफीचा विषय काढताच भाजपचे निषेधाचे नागोवा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली.