मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.  फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार  उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे

केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.