हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे भाजपने राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
संजय राऊत बोलतना म्हणाले की, “ज्या पद्दतीनं ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. तसेच मी आणि माझ्या कुटुंबियांवरही त्यांनी आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे. नाहीतर मी अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते न्यायालयात जाईल. पण हे आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे.” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, ठाकरे सरकार कडून भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्यात आली आहे यावर विचारलं असता ते म्हणाले, आमच्याही सिक्युरिटी यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही. मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’