काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राऊतांची हटके प्रतिक्रिया; म्हणाले की….

0
23
raut and nana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस स्वबळावर  सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असा टोला राऊतांनी काँग्रेसला लगावला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, स्थानिक पातळीवर आघाडीनं एकत्र लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय असेल. काँग्रेस पक्ष स्वबळावर नरेंद्र मोदी व भाजपच्या सरकारचा पराभव करणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

जिथं सेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न होतील तिथं तिथं मी जाणार असं म्हणत आगामी पुणे मनपात सेना किंग किंवा किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडेही आमचं लक्ष असल्याचंही संजय राऊत सांगायला विसरले नाहीत. महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित असून राज्यातलं आघाडी सरकार नीट चाललं असल्याचंही ते म्हणालेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here