शहा- पवार भेटीत चुकीचं काय; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या, असं राऊत यांनी सांगितलं. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे. दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं, असंही ते म्हणाले.

यावेळी राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावलं. विरोधकांना कोणताच रंग नाही. रंग असता तर त्यांनी चांगले रंग उधळले असते. पण विरोधक बेरंग आहेत. म्हणून त्यांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत. ऊठसूठ रंग उधळू नयेत. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगड्या गुंतवू नयेत. रंग खेळण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी शांत राहावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment