हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं.अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group