देवेंद्र फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते, त्यामुळेच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही ; राऊतांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली.

महाविकासआघाडी सरकारने सुचविलेल्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून आम्ही अभ्यास करतोय, असे सांगितले जात आहे. बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी पीएचडी करत असावेत. तसेच 12 आमदारांची नावं किती जास्त काळ मांडीखाली दाबून ठेवता येतील, याचा विक्रम राज्यपालांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा असेल, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like