Tuesday, June 6, 2023

सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास…; संजय राऊतांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार फक्त 3 महिन्यांत कोसळेल असं नव भाकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्राचा नंबर येणार अस म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा टोला राऊतांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’